राज ठाकरे लीलावती रुग्णालयात ऍडमिट

टीम : ईगल आय मीडिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांच्यावर कमरेजवळच्या स्नायूची शस्त्रक्रिया होत आहे, त्यासाठी ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या आजच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे सहभागी झाले नाहीत.

राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे त्यांना बसण्यास त्रास जाणवत होता. उपचारासाठी राज ठाकरे यांनी 3 दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात MRI चाचणी केली होती. आज त्या स्नायूवर छोटी शत्रक्रिया करण्यात येणार होती. फार गंभीर बाब नाही.शस्त्रक्रिया झाल्यावर दुसऱ्या दिवशीच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवले जाईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठक बोलावलीय. या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या बैठकीला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती, परंतु त्यांना शस्त्रक्रियेसाठी लीलावतीत दाखल करण्यात आल्यानं ते या बैठकीला उपस्थित राहू शकलेले नाहीत.

परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कंबरेच्या दुखण्याच्या त्रासाची माहिती जाणून घेत विचारपूस केली होती. तसंच लीलावती रुग्णालयातील काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याचेही सुचवले होते.

Leave a Reply

error: Content is protected !!