महाराष्ट्रात काही झालं तर ओरडणारे आज का गप्प ? राज ठाकरेंनी विचारला मिडियालाही जाब
सोशल मीडियावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे
टीम : ईगल आय मीडिया
उत्तर प्रदेशातील बलात्कार बलात्कार आणि राहुल गांधी यांना पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यापासून रोखल्यामुळे देशभर संतप्त पडसाद उठले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हाथरस प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला असून, ही घटना पाशवी असल्याचं म्हटलं आहे. सरकारला कशाची भीती वाटतेय असाही जाब राज यांनी विचारला आहे. रिपब्लिकन भारत च्या अर्णब गोस्वामी यांचे नाव न घेता, महाराष्ट्रात काही झालं की स्वतःला देशाचा आवाज घोषित करुन अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? असा प्रश्न राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांना विचारला आहे.
राज ठाकरेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपली प्रतिक्रिया देत एकूणच प्रकरणात संताप व्यक्त केला आहे. यावेळी राज ठाकरेंनी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यापासून का अडवलं जात आहे, नक्की कशाची भीती सरकारला वाटत आहे असा प्रश्न विचारला आहे.