बोहाळीत होणार आरोग्य उपकेंद्र

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा हिरवा कंदील : नागेश फाटे यांच्या प्रयत्नाला यश !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या बोहाळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा प्रश्‍न मार्गी लागला असून राष्ट्रवादी काँग्रेस व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. नुकतेच मुंबई येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेत बोहाळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास संमती दिली आहे.


बोहाळी (ता.पंढरपूर) हे गाव खर्डी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत आहे. मात्र, या केंद्राच्या अंतर्गत असलेल्या सहा गावातील लोकसंख्येचा भार जास्त होत आहे. हे ओळखून लोकांना आरोग्य सेवा वेळेत व जागेवर मिळाव्यात, यासाठी बोहाळीचे सरपंच शिवाजी पवार, उपसरपंच जगन्नाथ जाधव, बाळासाहेब जाधव, तानाजी रणदिवे, संतोष शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे तालूका उपाध्यक्ष कल्याण कुसुमडे यांनी ठराव संमत केला. याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांना हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी साकडे घातले.


पंधरा वर्षाची प्रतिक्षा !

पंधरा वर्षापूर्वी मंजूर झालेले बोहाळी प्राथमिक उपकेंद्र पाठपुराव्याअभावी दुसरीकडे गेले. तेव्हापासून बोहाळी येथील ग्रामस्थ आरोग्य उपकेंद्राच्या प्रतिक्षेत होते. मात्र, अखेर नागेश फाटे व कल्याण कुसूमडे यांच्या प्रयत्नातून, पाठपुराव्यामूळे प्रश्‍न मार्गी लागत आहे.

नागेश फाटे यांनी सामाजिक प्रश्‍न लक्षात घेवून तात्काळ पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार नागेश फाटे व कल्याण कुसुमडे यांनी नुकतीच मुंबई येथे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. यावेळी बोहाळी प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ बोहाळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या फाईलवर सही करुन तात्काल उपाययोजन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामूळे गेले कित्येक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या उपकेद्रास मान्यता मिळणार असल्याने बोहाळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांमधून नागेश फाटे व कल्याण कुसुमडे यांचे अभिनंंदन केले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!