टॉपचे तिन्हीही नंबर मुलींनी पटकावले
फुलचिंचोली : सावता जाधव
फुलचिंचोली ( ता. पंढरपूर ) येथील
राजीव गांधी माध्यमिक विद्यालयाचा इ.१० वी मार्च २०२० चा निकाल ९८.२१% एवढा लागलेला आहे. विशेष म्हणजे प्रथम तीनही क्रमांक मुलींनी पटकावले आहेत.
राज्य परीक्षा मंडळाने घेतलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये राजीव गांधी विद्यालयाने घवघवीत यश मिळवले असून 98 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.
प्रथम क्रमांक कु. प्रक्षाळे प्राजक्ता सज्जन – ८५.४०% द्वितीय क्रमांक कु. जाधव स्वप्नाली तानाजी – ८१.८०% आणि तृतीय क्रमांक कु.डोंगरे सुजाता रमेश – ८१.२०% यांनी पटकावले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष एस. डी. राजे, सचिव मा. चंद्रशेखर राजे – भोसले तसेच भीमा शुगरचे माजी व्हा. चेअरमन कल्याणराव पाटील, भीमाचे संचालक बिभीषण वाघ, विठ्ठलचे संचालक नारायण जाधव, सरपंच सौ संगीता अशोक जाधव, उपसरपंच भगवान प्रक्षाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब सुतार, युवक नेते रमाकांत नाना पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक अजित नकाते , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.