खेडभोसे ग्रामस्थांची राजूबापू पाटील यांना श्रद्धांजली
पंढरपूर : ईगल आय मीडिया
खेडभोसे गावावर त्यांचे विशेष प्रेम होते. प्रत्येक वर्षी येणारा महापूर असो किंवा इतर नैसर्गिक आपत्ती असो अशावेळी राजूबापू पाटील यांनी स्वतः गावांमध्ये येऊन ग्रामस्थांना वेळोवेळी मदत केली होती. अशा लोकनेत्याचे अकाली निधन झाल्यामुळे पाटील परिवाराबरोबरच खेडभोसे ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि विठ्ठल सहकारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक (कै.) राजूबापू पाटील यांना खेडभोसे ग्रामस्थांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनेकांना बापूंच्या आठवणी सांगताना गहिवरून आले होते. त्यामुळे श्रद्धांजली सभा अतिशय दुःखद वातावरणात पार पडली.
पंढरपूर तालुक्यातच नाही तर जिल्हाभरात एक सन्मार्गी लोकनेता म्हणून राजूबापू पाटील यांची ओळख होती.मात्र राजूबापू पाटील यांचे नुकतेच कोरोना आजारामुळे निधन झाले होते.
राजूबापू पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आज रविवारी (दि. 16 ऑगस्ट) रोजी खेडभोसे ग्रामपंचायत कार्यालयासमोर शोक सभा आयोजित करण्यात आली होती.
या शोकसभेसाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना राजूबापू पाटील यांना श्रद्धांजली वाहताना गहिवरून आले होते.
यावेळी सरपंच सज्जन लोंढे, उपसरपंच सिद्धेश्वर पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शोक सभेचा ठराव बंडू पवार यांनी मांडला, त्यास माजी उपसरपंच सिद्धेश्वर पवार यांनी अनुमोदन दिले.