लोकनेते राजूबापू पाटील यांचे निधन !

पंढरपूर तालुक्याला हादरा : कोरोनाने घेतला बळी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष, प्रांतिक सदस्य, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजूबापू पाटील यांचे गुरुवारी (दि.१३) पहाटे कोरोना मुळे निधन झाले. हे वृत्त पंढरपूर तालुक्याला हादरा देणारं आहे.
गुरुवारी मध्यरात्री सोलापूर येथे अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ते 58 वर्षांचे होते. राजूबापू पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्या यांच्यावरही उपचार सुरू आहेत. या धक्कादायक वृत्ताने पंढरपूर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राजूबापू पाटील यांच्या घरातील सर्वच सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि उपचार सुरू आहेत. बापूंच्य निधनाचे वृत्त समजताच गाव आणि संपूर्ण तालुक्यात दुःख व्यक्त होत आहे.

चार दिवसांपूर्वी धाकट्या भावाचे निधन
चारच दिवसांपूर्वी राजूबापू पाटील यांचे धाकटे भाऊ आणि कृषिराज शुगर चे चेअरमन महेश पाटील यांचे ही कोरोनामुळे निधन झाले. त्यांना उपचारासाठी पुणे येथे घेऊन जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली होती. मात्र राजू बापू यांना या दुःखद बातमीची माहिती दिली नव्हती.

१ ऑगष्ट रोजी त्यांचे चुलते डॉ. अनंतराव पाटील यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यामुळे त्यांना पंढरपूर येथे अधिक उपचारासाठी नेण्यात आले होते, यावेळी सर्व पाटील कुटुंबीय त्यांच्या सोबत होते, दुर्दैवाने डॉ. अनंतराव पाटील यांचे कोरोना मुळे निधन झाले होते.
या सर्वांवर उपचार सुरू होते.
राजूबापू पाटील यांच्या पश्चात चुलते रावसाहेब पाटील, भाऊ शेखर पाटील, पत्नी पंचायत समिती सदस्या प्रफुल्लता पाटील, मुलगा उपसरपंच गणेश पाटील, सून, दोन विवाहित मुली असा मोठा परिवार आहे.

तालुक्यावर शोककळा


पंढरपूर तालुक्यात राजूबापू पाटील यांनी आपल्या कार्याच्या रूपाने एक वेगळा ठसा निर्माण केला होता. सांप्रदायिक घराणे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती.
पक्षीय राजकारण बाजूला ठेवून त्यांना मानणारा ठराविक वर्ग तालुक्याच्या गावागावात होता. तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वाचा नेता म्हणून त्यांना ओळखले जात होते.
अशा नेत्याचा कोरोना मुळे निधन झाल्यामुळे भोसे गावाबरोबरच तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!