मुख्यमंत्री शिंदे यांच्या मातोश्री स्व. गंगुबाई शिंदे यांचे नावे उघडले होते अन्नछत्र
पंढरपूर : eagle eye news
मोहोळ विधानसभा मतदार संघांचे उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी राज्याचे गतिमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री स्व. गंगुबाई संभाजी शिंदे यांचे स्मरणार्थ आषाढी वारीतील भाविकांना अन्नछत्र उघडले होते . याचे उदघाटन शिवसेनेचे मुख्य पक्षप्रतोद आ. भरतशेठ गोगावले यांचे हस्ते करण्यात आले. दोन दिवसात हजारो भाविकांनी या अन्नछत्रमध्ये महाप्रसाद घेतला.
या अन्नछत्रात एकादशी दिवशी दिवसभर फराळाचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या दिवशी मिष्टान्न भोजन देण्यात आले.याचा १५ हजाराहून अधिक भाविकांनी लाभ घेतला आहे. राजू खरे यांचेकडून अनेक उपक्रमाचे माध्यमातून अनेकांना मदत करण्याचा त्यांचा नावलौकिक आहे. गोपाळपूर पासून जवळ असलेल्या दर्शन रांगेलगत हे अन्नदान करण्यात आले आहे त्यामुळे भाविकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला. गोपाळपूर येथील जनाबाईचे दर्शन घेऊन ये जा करणाऱ्या भाविकांना या अन्नछत्राचा लाभ घेता आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी वारी नियोजन पाहण्याचा दौरा रविवारी होता. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री यांनी राजू खरे यांनी उघडलेल्या या अन्नछत्रचे जवळपास आले होते. यावेळी राजू खरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अन्नछत्र पाहून खरे यांच्या कार्याचे कौतुक केले होते.
याठिकाणी स्वतः राजू खरे, त्यांच्या पत्नी सौं तृप्तीताई खरे, बंधू विजय खरे, कु.अवंती खरे, कु.अबोली खरे, मारुती खरे, सौं राखी खरे, गोपाळपूर सरपंच अरुण बनसोडे, नेपातगाव सरपंच पांडुरंग परकाळे, रामहिंगणी सरपंच संभाजी लेंगरे, पाटुकुल उपसरपंच गणेश नामदे, समाधान यादव, आंबेचे माजी सरपंच प्रकाश माळी, लक्षमन गायकवाड, माऊली कोळी,नोमिनाथ सिरसट, लखन वाघमारे, निखिल गायकवाड, अतिश सावंत, सिद्धू चव्हाण, सुभाष बनसोडे,राहुल जावळे,सौं जोती जावळे,सिद्धार्थ लोखंडे पाटील,संजय मस्के,रणजित गळीतकर,शिवसेना उत्तर सोलापूर प्रमुख उमाकांत करंडे,कैलास कोरडे,यांचेसह राजू खरे परिवार यांचेसह समर्थक यांनी परिश्रम घेतले .
अन्नदान हेच श्रेष्ठदान 💐