कितीही भगीरथ प्रयत्न करा , निवडून येणार सचिन पाटील

माजी खा.राजू शेट्टी : स्वाभिमानी च्या उमेदवाराचा प्रचार सुरू

पंढरपूर : ईगल आय मीडिया

स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीत आहे. माञ हे सरकार शेतकरी विरोधी आहे. यामुळे या पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठरवूनच उमेदवार उभा केला आहे. तुम्ही कितीही भगीरथ प्रयत्न करा निवडून सचिन पाटीलच येणार असल्याचे माजी खा.राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांचा रांझणी येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे रविकांत तुपकर, तानाजी बागल, विजय रणदिवे, रणजित बागल, पै साहेबराव नागणे, धनंजय बागल आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना खा शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी संघटनेची लढाई केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आहे. दिल्लीत चार महिनेपासून शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे माञ केंद्र सरकार तोडगा काढत नाही. लाॅकडाऊनच्या काळातील तीन महिने घरगुती विज बिल माफ करण्याची‌ मागणी आम्ही केली होती. माञ राज्य सरकारने सरसकट विज बिल तोडली. ऎन उन्हाळ्यात विज कापून शेतक-यांची पिके वाळवत आहे.


४६ कोटी दामाजी कारखानाची तर ४० कोटी विठ्ठलची थकबाकी आहे. १४ दिवसात ऊसाचे पैसे दिले नाही तर जप्तीची कारवाई होते. हे दोघेही थकबाकीदार असताना यांचा अर्ज का उडला नाही असा प्रश्न शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला. ऊस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले तरी दामाजीचे चेअरमन ऎशोआरामात राहत आहेत. दिल्लीत चार महिनेपासून शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. माञ या आंदोलनावर तोडगा निघत नाही. शेतक-यांना देशोधडीला लावणारे भाजपचे सरकार असल्याचेही खा. राजू शेट्टी म्हणाले.

यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, स्वाभिमानी ची ही निवडणुक महाराष्टाला दिशा देणारी निवडणुक ठरणार आहे. शेतक-यांसाठी ही उमेदवारी आहे. भगिरथ भालके बापाच्या नावाने मते मागत आहेत. मग शेतक-यांची वीज कापली तेव्हा भगिरथ भालके – समाधान आवताडे कुठे गेले होते..? असा आरोप करीत पैशाचा आणि सत्तेचा माज उतरणेसाठी स्वाभिमानीला‌ मतदान द्या.

विठ्ठल व दामाजी कारखानेने शेतक-यांना एफआरपीची रक्कम दिली नाही. शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. सचिन पाटलांनी जे शेतक-यांसाठी काम केले त्याची मजूरी म्हणून सचिन पाटलांना मतदान करण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केले.

Leave a Reply

error: Content is protected !!