रक्षाबंधन : भावाने बहिणीला टपाल जीवन विमा पॉलिसी भेट द्यावी

पंढरपूर विभागीय पोस्ट अधीक्षक चंद्रकांत भोर यांचे आवाहन

रक्षाबंधन हा बहिण भावाच्या अतूट नात्याची वीण घट्ट करणारा सण आहे. बहीण आपल्या भावाला अत्यंत प्रेमाने राखी बांधून त्याच्याकडून रक्षणाची अपेक्षा ठेवते, असा सण सर्वांसाठी आनंददायी असा आहे. आताच्या काळामध्ये रक्षाबंधनाच्या निमित्त भावाने बहिणीला काय द्यावे? असा प्रश्न आजच्या तरुण पिढीला पडताना दिसतो आहे. मात्र बहिणीला विम्याचे संरक्षण कवच द्यावे असे आवाहन पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक चंद्रकांत भोर यांनी केले आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या बहिणीच्या नावे टपाल जीवन विमा पॉलिसी करावी, यामुळे बहिणीचे आयुष्य सुरक्षित होईलच परंतु त्याचबरोबर आपली बहीण आर्थिक दृष्ट्या संपन्न सुद्धा होणार आहे.

सोमनाथ गायकवाड, हेड पोस्टमास्तर, पंढरपूर

रक्षाबंधनाच्या निमित्ताने खास आपल्या बहिणीला आपल्या भावाने टपाल जीवन विम्याची पॉलिसी भेट द्यावी, त्यामुळे भेटवस्तूची रक्कम टपाल जीवन विम्याचा हप्ता भरण्यासाठी खर्च केली तर बहिणीचे आयुष्य जीवन विमा संरक्षणाने सुरक्षित होईल त्याचबरोबर बहिणीच्या नावे बचत होईल आणि ठराविक मुदतीनंतर बहिणीला टपाल जीवन विम्याच्या मुदतपूर्तीची रक्कम मोठ्या स्वरूपात मिळेल, असे भोर यांनी सांगितले आहे.

त्यामुळे बचत, विमा संरक्षण आणि आर्थिक लाभ आपल्या बहिणीला या रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने करून देण्यासाठी राखी का त्योहार मनाइये के पीएलआय के संग हा अनोखा उपक्रम पंढरपूर डाक विभागाने आयोजित केला आहे. आपल्या बहिणीच्या नावे टपाल जीवन विमा पॉलिसी करावी, यामुळे बहिणीचे आयुष्य सुरक्षित होईलच परंतु त्याचबरोबर आपली बहीण आर्थिक दृष्ट्या संपन्न सुद्धा होणार आहे. त्यामुळे या अनोख्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आजच आपण आपल्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक मा. चंद्रकांत भोर यांनी केले आहे.

बहिणीने आपल्या दूरवरच्या भावाला पाठवलेली राखी वेळेत पोहचावी आणि रक्षाबंधन सण उत्साहात साजरा व्हावा, यासाठी पुणे रिजनमधील प्रत्येक डाकघरात दिनांक १८ ऑगस्ट रोजी रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही राख्यांच्या टपाल वाटपाचे काम पंढरपूर डाक विभागातील सर्व कर्मचारी यांनी केलेले आहे. यामुळे आलेले प्रत्येक राखीचे पाकीट प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे काम डाक कर्मयोगी असणाऱ्या सर्व पोस्टमन बंधूंनी केलेले आहे या उपक्रमामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!