उद्यापासून पंढरपूर शहरात रॅपिड अँटीजन टेस्ट अभियान

पंढरपूरच्या नागरिकांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लक्षणे दिसत नसलेल्या तरीही कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांचा शोध घेण्यासाठी 8 ऑगस्ट रोजी पंढरीत रॅपिड अँटीजन टेस्ट कॅम्प आयोजित केला असून जास्तीत जास्त नागरिकांनी टेस्ट करून घ्याव्यात असे आवाहन नगरपालिकेच्यावतीने केले आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,पंढरपूर शहरांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, होणारा संसर्ग रोखण्यासाठी व टाळण्यासाठी पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने गजानन महाराज मठ येथे सकाळी 11 ते 3 यावेळेत रॅपिड अँटिजिन टेस्ट घेण्यात येणार आहे.

13 ऑगस्ट पर्यंत दररोज आणि निःशुल्क या टेस्ट केल्या जाणार आहेत. त्यामध्ये शहरातील नागरिक, व्यापारी, बँक कर्मचारी,पेट्रोल पंप कर्मचारी व इतर अस्थापनामध्ये काम करत असलेले मालक – चालक व कर्मचारी व इतर कोणाला ही अशी टेस्ट करायची असेल त्यांनी टेस्ट करून घ्यावी.
उद्या ( दि 8 ऑगस्ट2020 ) पासून श्री संत गजानन महाराज मठ येथे सकाळी 11 ते 3 यावेळेत आपली रॅपिड अँटिजिन टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!