पंढरपूर : ईगल आय न्यूज
वाखरी ( तालुका पंढरपूर ) येथील बागल कृषी केंद्राचे संचालक दीपक बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस ( एस पी ) पक्षाच्या उद्योग आणि व्यापार आघाडीच्या पंढरपूर तालुकाध्यक्ष पदी निवड झाली आहे. रविवारी टेंभुर्णी येथे झालेल्या पक्षाच्या पदाधिकारी निवडी प्रसंगी पक्षाच्या उद्योग व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते आणि अकलूज चे माजी सरपंच शिवतेज सिंह मोहिते पाटील, संजय कोकाटे यांच्या उपस्थितीत दीपक बनसोडे यांनी निवडीचे पत्र देण्यात आले.
खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे समर्थक असणारे दीपक बळीराम बनसोडे यांनी कृषी पदवी मिळवल्यानंतर खते आणि रासायनिक औषधे विक्री व्यवसायाचा शुभारंभ केला. अल्पावधीतच त्यांनी व्यवसायात मजबूत स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या यशाची दखल घेऊन पक्षाच्या उद्योग, व्यापार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी दीपक.बनसोडे यांची पंढरपूर तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे.
दीपक बनसोडे हे तालुक्यातील उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील लोकांना पक्षाशी जोडून घेतील, सरकार पातळीवर त्यांच्या अडी अडचणी सोडवतील अशी अपेक्षा फाटे यांनी यावेळी व्यक्त केली. या निवडी बद्दल दीपक बनसोडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.