राज्यात विक्रम : 24 तासांत 27 हजार कोरोना रुग्ण

97 जणांचा मृत्यू : मुख्यमंत्र्यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

टीम : ईगल आय मीडिया

शनिवारी महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत तब्बल 27 हजार 127 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांच्या मृत्यूमध्येही शनिवारी वाढ पाहायला मिळत आहे. शनिवारी एकूण 97 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 6 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.


महाराष्ट्रात आतापर्यंत 24 लाख 49 हजार 147 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातील 22 लाख 3 हजार 553 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. तर 53 हजार 300 जणांचा कोरोनांमुळे मृत्यू झालाय. मुंबईत काल 2 हजार 982 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 1 हजार 780 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 4 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.

पुण्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. पुण्यात दिवसभरात 3 हजार 111 जणांचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर आज 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 20 हजार 889 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 538 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीय.


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रात तब्बल 62 टक्के, केरळमध्ये 8.83 टक्के तर पंबाजमध्ये 5.36 टक्के रुग्ण आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात 81.38 टक्के मृत्यू हे 5 राज्यांमध्ये आहेत. कोरोनामुळे होणारे मृत्यूही महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी 70 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

Leave a Reply

error: Content is protected !!