पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी विक्रमी मतदान

सोलापूर जिल्ह्यात पदवी धरांसाठी 62 तर शिक्षकांसाठी 85 टक्के मतदान झाले आहे.

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे विक्रमी मतदान झाले आहे. या मतदारसंघात आजवरचा मतदानाचा विक्रम मोडीत काढला आहे. त्यामुळे जिंकणार कोण याबाबत ची उत्सुकता अधिकच वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले आहे.

जिल्ह्यात पदवीधर मतदार संघ मतदान एकूण मतदान केंद्रे 123 आहेत. त्यात पुरुष पदवीधर मतदार: 42070 आणि
स्त्री पदवीधर मतदार: 11742 आहेेेत.
इतर (TG) पदवीधर मतदार 1 आहेत.
एकूण पदवीधर मतदार 53813 आहे. सकाळी ८ ते ५या कालावधीत झालेले मतदान पुरुष 27170 तर स्त्री मतदार 6229 आहेत. एकूण : 33399 मतदान झाले असून त्याची टक्केवारी : 62.07 टक्के आहे.

शिक्षक मतदार संघात मतदान एकूण 85 टक्के आहे, तर मतदान केंद्रे: 74 इतकी असुुन पुरुष शिक्षक मतदार 10561 तर स्त्री शिक्षक मतदार 3023 एकूण शिक्षक मतदार 13584 मतदार आहेत.
सकाळी ८ ते ५ कालावधीत झालेले मतदान
पुरुष मतदार 9225 स्त्री मतदार 2371 असे एकूण 11558 मतदान झाले असून मतदान टक्केवारी : 85.09% इतकी येत आहे.
मतदानाच्या अंतिम अकडेेवावारीमध्ये बदल होऊ शकतो असे निवडणूक विभागा कडून सांंगणंयात येते.

Leave a Reply

error: Content is protected !!