रेणू शर्माने तक्रार मागे घेतली

धनंजय मुंढे यांना दिलासा

टीम : ईगल आय मीडिया

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराच्या आरोपाची पोलिसात दाखल केलेली तक्रार रेणू शर्मा या महिलेने मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंढे याना मोठा दिलासा मिळाला आहे. तशा प्रकारे तिने पोलिसांना लेखी लिहून दिलं असून कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं.

मागील 15 दिवसांपूर्वी रेणू शर्मा यांनी केलेल्या धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. स्वत: फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी संमती संबंधाचा खुलास केला होता. मात्र पैशांच्या कारणास्तव मला रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा म्हणावा लागेल. रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती.


रेणू शर्मा यांच्या दाव्यानुसार धनंजय मुंडे यांच्याशी 1997 मध्ये त्यांची ओळख झाली होती. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बहीण करुणा शर्मा यांच्या घरी भेटल्याची माहिती आहे.

पार्श्वगायनाच्या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याच्या आमिषाने, बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक-निर्मांत्याशी भेट घडवण्याच्या आमिषाने धनंजय मुंडे यांनी इच्छेविरुद्ध आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले, तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप रेणू शर्मा यांनी केला होता.

Leave a Reply

error: Content is protected !!