71 हजार बरे झाले : 524 मृत्यू
टीम : ईगल आय मीडिया
गेल्या २४ तासांत राज्यात नवीन कोरोना बाधित रुगांची संख्या एकदम घटली आहे. मागील 24 तासात राज्यात ४८ हजार ७०० नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर 524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (काल) ही संख्या ६६ हजार १९१ इतकी होती. कालच्या तुलनेत आज मोठी घट झाली असून हा फरक १७ हजार ४९१ इतका आहे.
या बरोबरच, राज्यात गेल्या २४ तासांमध्ये एकूण ७१ हजार ७३६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या ६१ हजार ४५० इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ७४ हजार ७७० वर जाऊन पोहचली आहे.
राज्यात नव्या करोना बाधित रुग्णांची वाढ वेगवान गतीनेच होत असताना आज राज्यातील जनतेला मोठा दिलासा देणारे वृत्त असून गेल्या काही दिवसांपासून ६५ हजार ते ७० हजारांच्या घरात वाढणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.