सोलापूर जिल्ह्यातील निर्बंध जैसे थे

जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट 5 .12 टक्के दाखवला

टीम : ईगल आय मीडिया

पुढील आठवड्यातील निर्बंध हटवण्यासंदर्भातील आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील निर्बंध जैसे थे राहणार असल्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे पुढील 8 दिवस सर्व सेवा, दुकाने, बाजारपेठ दुपारी 4 वाजेपर्यंत च खुली राहणार आहेत. तर वैद्यकीय सुविधा फक्त अधिक वेळ ( 24 तास ) खुली राहणार आहे.

मागील गुरुवारी राज्य सरकारने प्रसिद्ध केली असून यात राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी रेट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पाच टक्क्यांच्या आत पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांनासोमवार पासून मोठा दिलासा मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात होत होता.त्यामुळेच सोमवार पासून सगळे निर्बंध हटण्याची अपेक्षा होती.

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. गुरुवार अखेर केलेल्या पाहणी नुसार सोलापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 3.73 टक्के आला असल्याने सोमवार पासून संपूर्ण जिल्ह्यातील निर्बंध दूर केले जाण्याची शक्यता होती. या संदर्भात जिल्हाधिकारी दोन दिवसात आदेश काढतील अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र आज जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट 5. 12 जाहीर करून जिल्हाधिकार्यांनी निर्बंध जैसे थे ठेवले आहेत. तसेच ऑक्सिजन बेड उपलब्धता ही ( 14.78 टक्के ) असल्याने जिल्ह्याचा समावेश दुसऱ्या गटात कायम आहे.

राज्य सरकारने निर्बंध हटवण्यासंदर्भात पाच गट तयार केलेले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची संख्या यानुसार या जिल्ह्यांचं वर्गीकरण केलं जातं. सरकारने काढलेल्या आदेशाप्रमाणे ५ टक्क्यांच्या आत पॉझिटिव्हीटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णपणे हटवण्यास परवानगी आहे. तर सर्वात जास्त पॉझिटिव्हीटी रेट असणाऱ्या जिल्ह्यातील निर्बंध वाढवण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल, जिम, प्रायव्हेट ऑफिसेस सुरू होण्यास मोकळीक मिळलेली नाही. निर्बंध हटवण्यासंदर्भातील पंचस्तरीय कार्यपद्धती लागू करून 3 आठवडे झाले आहेत.

या सरत्या आठवड्यात जिल्हा ग्रामीणचा पॉझिटिव्हिटी दर 5.12 टक्के असून ऑक्सिजन बेडची ( अ‍ॅक्युपन्सी) दर ही 14.78 टक्के असल्याने ग्रामीण भागात अनलॉकची स्थिती ही मागील आठवड्याप्रमाणेच असणार आहे. सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने दुपारी चार पर्यंत सुरू राहतील तर शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद राहणार आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!