पुरंदरेंचा महाराष्ट्र ‘भूषण पुरस्कार’ परत घ्या !

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांची मागणी

सोलापूर : ईगल आय मीडिया

राजसाहेब तुम्ही प्रबोधनकारांचे नातू की बाबा पुरदरेंचे ते सांगा, असा सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे.तसेच पुरंदरे यांचा पुरस्कार महाविकास आघाडी सरकारने परत घ्यावा, अशीही मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच वाढदिवसानिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या घरी जावून त्यांच्या पायावर डोके ठेवले होते. यावरुनच संभाजी ब्रिगेड राज ठाकरेंना सवाल केला आहे.

पत्रकार परिषदेस संभाजी ब्रिगेड जिल्हाअध्यक्ष संभाजी भोसले , महानगरअध्यक्ष श्याम कदम, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सीताराम बाबर, जिल्हा सचिव राहुल सावंत, संघटक सुलेमान पीरजादे, दत्ता जाधव उपस्थित होते.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनी पूर्ण महाराष्ट्राचं प्रबोधन त्यांच्या साहित्यातून केले आहे. त्यांनी त्यांच्या रंगो बापुची नावाच्या चाळीस पानाच्या पुस्तकात पुरंदरे यांची सर्व चालाखी उघड केली आहे. ते पुरंदरेच्या लेखनाला भटी लिखाण म्हणतात. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील हे कसले शाहिर हा तर सोंगाड्या आहे, असे विधान केले होते. जेम्स लेनच्या नावाखाली जिजाऊंची व शिवरायांची बदनामी करणारे हेच ते पुरंदरे आहेत. पंढरपूर मध्ये आल्यानंतर शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी गुरू नाहीत हे लेखी देऊन माफी मागावी लागली होती.

जेम्स लेन समर्थक बहुलकरांच्या तोडांला पुणेत शिवसेना पदाधिकारी व शिवप्रेमींनी काळे फासले होते. त्यांना माफी मागायला राज ठाकरे यांनी भाग पाडले. पहिल्यांदा वायफळ बोला लिहा व नंतर माफी मागा ही परंपरा सावरकरांकडूनच पुरंदरे व राज ठाकरे यांना मिळाली आहे. प्रबोधनकरांचे आपण नातु आहात की पुरंदरेचे ते आधी एकदा स्पष्ट करावे, अशीही मागणी केली.

तत्कालीन फडणविस सरकारने ब. मो. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. त्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला देशभरातील साहित्यिक अभ्यासक, प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी शिवप्रेमी अनेक संघटना यांनी विरोध केला होता. तरीही खुर्चीचा व सत्तेचा बळाचा वापर करीत पुरस्कार देऊन त्या पुरस्काराची किंमत कमी केली. आम्ही महाविकास आघाडी सरकारला मागणी करतो की सदरील महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्यावा.

महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत भाजपासोबत युती करायची असल्याने गुजरातच्या व नागपूरच्या मालकाला खुष करण्याचे हे धंदे सुरु आहेत. पुण्यातील एक मोरे कोण आहेत त्यांनी म्हणे फिरु न देण्याची धमकी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्ष प्रविण गायकवाड यांना दिली असं समजल.

आता हे मोरे कोण जावळीचे गद्दार असलेले चंद्रहास मोरे यांनी शिवाजी महाराजांना विरोध केला होता, त्यांचेच हे मोरे वंशज आहेत.  प्रविण गायकवाड हे शिवाजी महाराजांच्या घराण्याशी थेट निगडीत आहेत. प्रविण गायकवाड हेच पुण्याचे नागरिक आहेत. मोरेंनीच थोडं संभाळुन रहावे. कारण संभाजी ब्रिगेडला खळखट्याक शिकवायची गरज नाही. भांडारकर आम्हीच फोडले होते, वाघ्या आम्हीच फोडला होता. दादु कोंडदेव आम्हीच फोडला, सुदर्शनला आम्हीच फोडले होते. गडकरीचा पुतळा आम्हीच जमीनदोस्त केला होता. त्यामुळे आम्हाला फोडाफोडी शिकवु नका, पुरषोत्तम खेडेकर साहेब व प्रविणदादा गायकवाड हे बहुजन मराठा समाजाचे मार्गदर्शक व दिशादर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या कोणतंही असंवेदनशील विधान खपवून घेणार नसल्याचे ठणकावून सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!