उद्या पासून सर्व दुकाने,जिम्स हॉटेल्स खुली
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन 13 ऑगस्ट पासून लागू केलेल्या संचारबंदी मधून पंढरपूर सह माळशिरस, करमाळा,माढा, सांगोला या तालुक्यातील दुकानदारांना दिलासा मिळाला आहे.
उद्यापासून ( दि.23 ) संचारबंदी चे निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेशात म्हटले. त्यामुळे उद्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना दुपारी 4 वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे.
हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना क्षमतेच्या 50 टक्केची सवलत दिली आहे. क्रीडांगणे, व्यायामशाळा यांना सकाळी 5 तर 9 पर्यंत खुली सूट दिली आहे. मंगल कार्यालयात 50 टक्के क्षमतेने विवाह आणि मंगल कार्यास परवानगी दिली आहे. मॉल्स, थिएटर यांना मात्र अजूनही बंदी लागू केली आहे. याबाबत अधिक माहिती सोबत जोडलेल्या आदेशामध्ये उपलब्ध औए.