टीम : ईगल आय मीडिया
मागच्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात आज बुधवारी व गुरुवार (दि. २२) या दोन दिवसांकरिता रेड आणि ऑरेंज अॅलर्ट दिलेला आहे.
काल मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ३ फुटांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या कालावधीमध्ये ७० ते १५० मिमी किंवा त्याहून जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.
सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि दिवसभर भूरभूर पाऊस होता. मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते. वेधशाळेने जिल्ह्यात बुधवार (दि. २१) व गुरुवार (दि. २२) या दोन दिवसांकरिता रेड आणि ऑरेंज अॅलर्ट दिलेला आहे. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. दिवसभरात गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या.
रात्री उशिरापर्यंत संततधार सुरू होती. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.