आजीच्या अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या नातवासह दोघांचा मृत्यू

मंगळवेढा तालुक्यातील दुर्दैवी घटना

टीम : ईगल आय मीडिया

आजीच्या अस्थी भीमा नदीत विसर्जन करण्यासाठी निघालेल्या नातवाचा आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य एका इसमाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवेढा तालुक्यातील माचनूर जवळ घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदेश्वर ( ता.मंगळवेढा ) येथील अरविंद ज्ञानेश्वर मेटकरी (वय 21 वर्षे ) यांच्या आजीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असून तिसऱ्या दिवसाचा विधी उरकल्यानंतर शनिवारी तो आजीच्या अस्थी भीमा नदीत विसर्जित करण्यासाठी तो बंडू पांडुरंग गोरे (वय 42 वर्षे ) यांच्यासह मोटारसायकल ( क्रमांक एम.एच.13 डी एल 1177 ) वरून माचनूर कडे निघाला होता.

मंगळवेढा – ब्रह्मपुरी मार्गावरील ब्रह्मपुरीजवळ आला असता समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने (क्रमांक एम एच 10 सी आर 6681 ) जोरदार धडक दिली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. टेम्पो चालकाविरोधात मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!