विविध मागण्यांसाठी राज्य सरकारला निवेदन
टीम : ईगल आय मीडिया
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांच्या अवहनानुसार व महा.राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, महाराष्ट्र राज्यात महिलांन वरील होणारे अन्याय अत्याचार थांबवावे, आगामी महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत या निवडणुकी साठीची शासनाने तयार केलेली प्रभाग पध्दत रद्द करून मुंबई महानगरपालिके सारखी वार्ड पध्दत सुरू करावी, ओबीसी,मुस्लिम व मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, ॲट्रोसिटी ॲक्ट या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, वाढत्या महागाईवरती केंद्र व राज्य शासनाकडून नियंत्रण ठेवण्यात यावी आदी स्वरूपाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या वेळी रिपाइंचे नेते आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, शहराध्यक्ष संतोष पवार, कुमार भोसले, दयानंद बाबर, संतोष सर्वगोड, कैलास कांबळे, सुरेश शिंदे, सचिन भोसले, राहुल मोरे, विजय वाघमारे, सचिन गाडे, भैय्या फडतरे, अजिंक्य ओव्हाळ, लक्ष्मण कांबळे, राजु शिंदे, भैय्या शिंदे, विक्रम चंदनशिवे, बबलु मागाडे, संदेश माने,आदी उपस्थित होते.