रिपाइं (आठवले गट ) च्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी संतोष पवार

शहराध्यक्ष पदी किर्तीपाल सर्वगोड यांची निवड


टीम : ईगल आय न्यूज


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या तालुकाध्यक्ष पदी संतोष पवार यांची तर पंढरपूर शहराध्यक्ष पदी किर्तीपाल सर्वगोड यांची निवड करण्यात आली. रिपाइंचे राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या उपस्थितीत शनिवारी कार्यकारिणी निवड करण्यात आली. राज्य संघटक सुनील सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, बाळासाहेब कसबे, रवी गायकवाड, कुमार भोसले, विठ्ठल शिरसागर आदी प्रमुख उपस्थित होते.


रिपाइंची पंढरपूर शहर आणि तालुका कार्यकारिणी निवडण्यासाठी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळी रिपाइंची बैठक अयोजित करण्यात आली होती. यावेळी  पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष पवार, पंढरपूर शहराध्यक्ष पदी किर्तीपाल सर्वगोड,  तालुका सरचिटणीस दयानंद बाबर, तालुका कार्याध्यक्ष सचिन भोसले, तालुका संघटन सचिव समाधान बाबर,  तालुका  उपाध्यक्ष वंशदीप शिंदे,  तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, तालुका उपाध्यक्ष निलेश जाधव यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. 

यावेळी राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड आदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.  रिपाईच्या नूतन कार्यकारीणी ची निवड केल्यानंतर राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

error: Content is protected !!