पंढरपूर : ईगल आय मीडिया
राज्यात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या दलित अत्याचाराच्या घटना आणि मुंबईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी करन्यात आलेल्या हल्ल्याचा
पंढरपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)शहर व तालुक्याच्यावतीने निषेध नोंदवण्यात आला. या संदर्भात उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांना लेखी निवेदन देण्यात आले. राज्यातील दलित अत्याचाराच्या घटना बंद व्हाव्यात, आरोपींना कठोर शासन व्हावे, राजगृहावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा रिपाईच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
मुंबईत राजगृह येथील झालेला हल्ला व राज्यातील बौद्ध व दलित समाजावर वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कवडे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी रिपाइंचे शहराध्यक्ष संतोष पवार, जेष्ठ नेते आप्पासाहेब जाधव, जितेंद्र बनसोडे, युवा आघाडीचे प्रदेशउपाध्यक्ष किर्तीपाल सर्वगोड, बाळासाहेब कसबे, कुमार भोसले , अर्जुन मागाडे , संतोष सर्वगोड ,कैलास कांबळे, दयानंद बाबर , सचिन कुमार भोसले ,समाधान लोखंडे, विजय वाघमारे, नगरसेवक डि.राज.सर्वगोड, अमित कसबे, सचिन गाडे, पोपट क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.