पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक
पंढरपूर : ईगल आय मीडिया
विदर्भातील अमरावती जिल्ह्यातून कौण्डिन्यपुर येथून रुक्मिणी मातेचा पालखी सोहळ्याने मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता पंढरीसाठी प्रस्थान ठेवले. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते रुक्मिणी मातेचा अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर राज्य शासनाच्या शिवशाही बस मधून पालखी परवानगी मिळालेल्या वीस वारकऱ्यांसह पंढरपूरकडे रवाना झाली आहे.
आषाढी एकादशीसाठी देशभरातून येणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये विदर्भातून येणाऱ्या रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्याचा समावेश आहे. सुमारे 800 किलोमीटर प्रवास करून हा पालखी सोहळा 425 वर्षापासून पंढरीच्या वारीला प्रत्येक आषाढीला येत आहे. यंदाच्या वर्षी कोरोना साथीमुळे पालखी सोहळा स्थगित करण्यात आला असला तरी वीस वारकऱ्यांसह पालखी सोहळ्यास शासनाने परवानगी दिलेली आहे . त्यानुसार सोमवारी सकाळी पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. रात्री उशिरापर्यंत सोळा पंढरपुरात दाखल होणार आहे.
यावेळी श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री नामदेवराव अमालकर व सचिव श्री सदानंद साधु ह्यांनी विधिवत पुजा केली. पालकमंत्री नामदार यशोमती ताई ठाकुर ह्यांचे हस्ते अभिषेक झाला. त्यानंतर भजन आरती व नंतर श्री अंबीकेमातेचे मंदिरात दर्शन घेऊन पुढे प्रस्थान झाले.
यावेळी अध्यक्ष श्री नामदेवराव अमालकर व सचिव श्री सदानंद साधु, पालकमंत्री नामदार यशोमती ताई ठाकुर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखेड़े,दिंडी प्रमुख श्री सुरेश चव्हाण,उपाध्यक्ष वसंत डाहे, हभप सर्जेराव देशमुख, हभप अशोक महाराज ऊरकुडे,विजयराव डहाके ,अशोक पवार अतुल ठाकरे सर्व विश्वस्त व भाविक हज़ार होते.