ऍड. मीनलताईंच्या समर्थनार्थ टेंभुर्णी उसळली महिलांची गर्दी
टेंभुर्णी : प्रतिनिध
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी कर्तव्य दक्ष महिला म्हणून ऍड.मीनल ताईंना माढा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी उमेदवारीच्या माध्यमातून दिली. सोलापूर जिल्ह्यात त्या एकमेव महिला उमेदवार असून पंढरीच्या विठुरायाची रुक्मिणी मीनलताई जनतेचा जनसेवक म्हणून या निवडणुकीत उभी आहे. त्या रुक्मिणीच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने या मतदारसंघातील बहिणींची ताकद उभे राहण्याची गरज आहे, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केले.
माढा विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व माहितीच्या अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट सौ मीनल साठे यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी माढा तालुक्याचे माजी आमदार धनाजीराव साठे उपस्थित होते.
यावेळी रूपालीताई चाकणकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या मतदारसंघातील जवळपास 93 हजार महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे. राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून मी राज्यातील महिलांच्या सुरक्षेची प्रामुख्याने जबाबदारी घेतेय.लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो मुलींच्या भविष्याचा फायदा झालेला आहे. शासनाचे अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांच्या किचन मधील बजेटची जबाबदारी महायुती सरकारने उचललेली आहे. महायुती शासनाच्या या सर्व जनसामान्य लोकांच्या कल्याणकारी योजना जर चालू ठेवायचे असतील तर आपण सर्वांनी मिळून या महायुतीच्या उमेदवार मीनल ताई साठे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणे अत्यंत गरजेचे आहे. माढ्यामध्ये मीनल साठे यांनी एक अनोखा उपक्रम राबवून आपल्या घरावरती आपल्या नावाची नेमप्लेट लावली हा खरोखर राज्यात एक उल्लेखनीय उपक्रम ताईने राबवलेला आहे.
आपल्या लाडक्या भावांचे विज बिल ही सरकारने माफ केले आहे. युवकांसाठी सुद्धा प्रशिक्षण भत्ता सुरू आहे.येणाऱ्या वीस तारखेला खऱ्या अर्थाने माढा मतदारसंघातून एक इतिहास घडवून या मतदारसंघातील धनशक्ती असणारे अपक्ष व खोके देऊन उमेदवारी घेतलेले तुतारीचे उमेदवार यांना यांची जागा दाखवा. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव महिला उमेदवार मीनल साठे यांना सर्वांनी मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवावे असे आव्हान करण्यात आले.
महायुतीच्या उमेदवार मीनल साठे यांनी बोलताना सांगितले की, या सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीने मोहोळ मतदार संघात केलेला एका महिलेचा अपमान व महायुती सरकारने सोलापूर जिल्ह्यातून माढा विधानसभा मतदारसंघात केलेला एका महिलेचा उमेदवारी देऊन केलेला सन्मान हा खरोखर आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या अभिमानाची गोष्ट आहे .मला माझ्या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार व महायुतीतील सर्व नेते मंडळींनी मला उमेदवारी दिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभारी आहे.
आपल्या विधानसभेतील विरोधी उमेदवार अभिजीत पाटील यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करत त्यांनी सांगितले की, या मतदारसंघात ही निवडणूक मी जनतेच्या न्यायासाठी हक्कासाठी लढते या निवडणुकीतून मी माघार घेण्यासाठी लढत नाही मी विरोधकांना सांगू इच्छितो की आपण पैसे देऊन उमेदवारी घेतलेली आहे. आणि मला माझ्या कार्याची दखल घेऊन उमेदवारी मिळालेले आहे. यामुळे आपण असल्या थापा मारू नये. मी मतदारांना आव्हान करू इच्छिते की अशा अनेक भूलथापा हे विरोधक करत आहेत. कारण यांच्या पायाखालची वाळू घसरलेले आहे. तरी या आपण यावर कुणीही विश्वास ठेवू नये. आपला विजय निश्चित असून सर्वांनी येणाऱ्या दिवसात रात्रीचा दिवस करून मतदान करावे असे आवाहन करण्यात आले.
या सभेचे प्रास्ताविक दादासाहेब साठे यांनी करताना सांगितले की, माढा तालुक्याच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्याचे सहकार महर्षी गणपतराव साठे यांच्या प्रेरणेने आम्ही माढा तालुक्यामध्ये आजपर्यंत विकासाचे राजकारण केले आहे.
या सभेसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ रुपाली ताई चाकणकर ,माढा विधानसभा मतदारसंघाच्या माहितीच्या उमेदवार ॲड.मीनल साठे ,माढा तालुक्याचे माजी आमदार धनाजीराव साठे, दादासाहेब साठे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस दिपालीताई पांढरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस सायारा शेख,युवती सेनेच्या जिल्हाध्यक्षा प्रियंका परांडे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, भाजपाचे तालुका अध्यक्ष योगेश पाटील, शिवसेनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष महादेव भोसले, आर पी आय आठवले गट तालुका अध्यक्ष भारत आठवले, माढा तालुका आरपीआय अध्यक्ष मारुतीराया वाघमारे, आरपीआय कार्याध्यक्ष बिभीषण कांबळे, आरपीआय संघटक पोपट लोंढे, माढा तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष माया माने, सोलापूर राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष संगीता जोगधनकर, माढा लोकसभा संयोजक सुनंदा भगत, भाजपा सरचिटणीस राहुल केदार, दत्ता जाधव, किसान मोर्चा भाजपा अध्यक्ष नंदकुमार मोरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्रीशैल मोरे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विष्णू बिचकुले, भाजपा माढा शहर अध्यक्ष मदन मुंगळे, भाजपा नेते जयसिंग ढवळे, माढा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष कल्पना जगदाळे, नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवक नगरसेविका सभापती , त्यासोबत महायुती घटक पक्षातील सर्व पदाधिकारी , पंढरपूर , माळशिरस ,माढा तालुक्यातील विविध गावचे सरपंच ,उपसरपंच व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या जाहीर सभेसाठी मतदारसंघातील लाडक्या बहिणींची उपस्थिती ही लक्षणीय होती.