सचिन वाझे ना 10 दिवसांची एन आय ए कोठडी

टीम : ईगल आय मीडिया

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना न्यायालयाने २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. वाझे यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. मुंबईतील न्यायालयासमोर वाझे यांना कोठडी देण्याची मागणी एनआयए करण्यात आली.

अंबानी यांच्या घराजवळ एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरूवातील सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले आहे.

स्फोटकं प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. यानंतर प्रकरणाला नवीन वळण मिळाले होते. स्फोटकं प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असताना मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एटीएसकडे सोपवला होता.

दरम्यान, दोन्ही यंत्रणांकडून तपास सुरू असताना शनिवारी एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी केली. १३ तास चाललेल्या चौकशीनंतर एनआयएच्या पथकाने शनिवारी रात्री वाझे यांना अटक केली. अटक करण्यात आल्यानंतर वाझेंना एनआयए न्यायालयसमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने वाझे यांची २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडीत रवानगी केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!