आपला माणूस म्हणून समाधान अवताडेना विजयी करा !

नंदेश्वर येथे माजी मंत्री सदाशिव खोत यांचे आवाहन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आपला माणूस म्हणून वेळ प्रसंगी आपल्या मदतीला धावणाऱ्या समाधान आवताडे यांच्यासाठी सर्वांनी आता पुढं यायला हवं. कोणत्याही भावनिक अमिषाला बळी न पडता.विकासासाठी समाधान अवताडे अर्थात कमळ चिन्हाला निवडून आणण्यासाठी सहकार्य करा आणि मतदान करा असे आवाहन माजी मंत्री सदाशिव खोत यांनी केले.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजप, रिपाई आठवले गट,रयत क्रांती संघटना, रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान महादेव आवताडे यांच्या प्रचारार्थ नंदेश्वर ( ता.मंगळवेढा ) येथे गावभेट दरम्यान कॉर्नर सभा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजप नेत्यांनी उपस्थित जनसमुदायाला आपला माणूस म्हणून वेळ प्रसंगी आपल्या मदतीला धावणाऱ्या समाधान आवताडे यांच्यासाठी सर्वांनी आता पुढं यायला हवं. कोणत्याही भावनिक अमिषाला बळी न पडता.विकासासाठी समाधान अवताडे अर्थात कमळ चिन्हाला निवडून आणण्यासाठी सहकार्य करा आणि मतदान करा असं आवाहन केले.

या प्रचारदौऱ्यानिमित्त माजी मंत्री सदाभाऊ खोत,आमदार राम सातपुते, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष राहुल बिडवे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर,भाजप जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, दामाजी कारखाना संचालक सुरेश भाकरे, दामाजी कारखाना संचालक सचिन शिवशरण, प्रा.येताळ भगत, प्रा.दत्तात्रय जमदाडे उपस्थित होते. सूत्रसंचालन दिगंबर यादव,अशोक उन्हाळे यांनी केले.

Leave a Reply

error: Content is protected !!