सभासदांचा आमच्यावर विश्वास : सभासद त्यांची अनामत जप्त करतील


कल्याणराव काळे  यांचा दावा : वाडीकुरोलीत ९० टक्के लोक बाहेरून आणलेले


पंढरपूर  : eagle eye news
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या गाठी भेटी घेण्यासाठी आम्ही गावभेट दौरे करीत आहोत. गोपाळपूर, मुंढेवाडी, आंबे या गावात आमच्या बैठकांना ९० टक्के सभासद उपस्थित आहेत, यावरून सभासदांचा आमच्यावर विश्वास आहे, आणि विरोधकांची अनामत रक्कम ही सभासद जप्त करतील, असा विश्वास सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी व्यक्त केला.  सहकार शिरोमणी साखर कारखाना निवडणुकी संदर्भात काळे यांचा सद्या गावभेट दौरा सुरू आहे. आंबे ( ता. पंढरपूर ) येथील गावभेट दौऱ्या नंतर काळे पत्रकारांशी बोलत होते.


यावेळी पुढे बोलताना काळे म्हणाले की, आम्ही गावागावात जाऊन सभासदांच्या गाठी भेटी घेत आहोत, कुणाच्या काही अडचणी आहेत का विचारतो आहोत. ऊस बिला संदर्भात काही शेतकरी विचारतात ही, या हंगामातील उसाची ७० टक्के बिले दिलेली आहेत, सीताराम कडील शेअर ची ९० टक्के रक्कम दिलेली आहे. ट्रॅक्टर मालक त्यांच्या थकबाकी बाबत विचारतात, त्यांचीही पन्नास ते साठ टक्के रक्कम दिलेली आहे. राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आहे, याची सभासदांना ही कल्पना आहे. बोटावर मोजता येतील एवढे साखर कारखाने चांगल्या स्थितीत आहेत. या परिस्थितीची सभासदांना कल्पना आहे. सभासदांचा चांगला प्रतिसाद ही मिळतो आहे, दादांनी केलेले सभासद आम्ही टिकवून ठेवले आहेत, त्यामुळे सभासदांचा  आमच्यावर विश्वास आहे आणि हे मत पेटीतून दिसून येईल, असा दावा काळे यांनी केला.


 वाडिकुरोली येथे गुरुवारी अभिजीत पाटील यांच्या सभेवेली गाव बंद होते, पिण्यास पाणीही मिळत नव्हते. यासंदर्भात विचारले असता. काळे म्हणाले की, वाडी कूरोली गावात सभा झाली, त्या सभेला विरोधकांनी बाहेरून माणसे आणली होती. ९० टक्के गर्दी ही गाव बाहेरून आलेल्या लोकांची होती. ग्रामस्थांनी  उत्स्फूर्तपणे गाव बंद केले होते. आम्ही कुणालाही तशा सूचना केलेल्या नव्हत्या. 

अभिजीत पाटील यांनी धोंडेवाडी येथील जमिनी संदर्भात केलेल्या आरोप विषयी विचारणा केली असता काळे म्हणाले की, यासंदर्भातील पूर्ण माहिती त्यांना नाही, तांत्रिक कारणासाठी धोंडेवाडी येथील शाळा जैनवाडी हद्दीत स्थलांतरीत केल्या नंतर कारखान्याच्या प्रयोग शाळेसाठी ती जागा घेतली गेली. आणि कारखान्याने तेवढीच जागा शिक्षण संस्थेला दिली. यामध्ये कुठेही आर्थिक गैर व्यवहार झालेला नाही. कारखाना असेल, शिक्षण संस्था असेल या आम्ही जीव ओतून चालवतो आहोत, असेही काळे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!