विकासासाठी समाधान अवताडे यांना निवडून द्या : पाटील

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आपला माणूस म्हणून वेळ प्रसंगी आपल्या मदतीला धावणाऱ्या समाधान आवताडे यांच्यासाठी सर्वांनी आता पुढं यायला हवं. कोणत्याही भावनिक अमिषाला बळी न पडता.विकासासाठी समाधान अवताडे अर्थात कमळ चिन्हाला निवडून आणण्यासाठी सहकार्य करा आणि मतदान करा असं आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलं.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार समाधान महादेव आवताडे यांच्या प्रचारार्थ वाखरी, गाडेगाव, बोहाळी ( ता.पंढरपूर ) येथे गावभेट दरम्यान सभा संपन्न झाली.

या प्रकारदौऱ्यानिमित्त उपस्थित प्रमुख माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप भटक्या विमुक्त युवा अध्यक्ष अमोल गायकवाड, पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे, सभापती अर्चना व्हरगर, उपसभापती राजश्री पंडितराव भोसले, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, जिल्हा परिषद सदस्य,पांडुरंग कारखान्याचे व्हा. चेअरमन वसंतनाना देशमुख, जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब गोसावी, भाजप नेते बी.पी.रोंगे, बाळासाहेब देशमुख, पांडुरंग संचालक सुरेश आगवणे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली हळणवर, दाजी पाटील, सूत्रसंचालन दिगंबर यादव, अशोक उन्हाळे यांनी केले.

Leave a Reply

error: Content is protected !!