सट्टा बाजारात समाधान अवताडेंचा भाव वधारला

भगीरथ भालके यांच्या भावात मात्र घसरण

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत सट्टा बाजार तेजीत असून मतदानानंतर भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांचा भाव वधारला असल्याचे सांगितले जाते. अखेरच्या दोन दिवसांत आलेल्या आर्थिक लाटेने भावनिक लाट पुसून टाकली असल्याचे मानले जात आहे. मात्र नेमका जनतेचा कौल काय आहे हे 2 मी रोजी समजणार आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यात जोरदार लढत रंगली होती. 14 एप्रिल पर्यंत महाविकास आघाडीची एकत्रित ताकद, आम भारत भालके यांच्या विषयीची सहानुभूती यामुळे सट्टा बाजारात भगीरथ भालके यांचा भाव वधारला होता.

भगीरथ भालके याना 100 रुपयास 50 रुपये, तर समाधान अवताडे यांना 100 रुपयास 100 रुपये असा भाव सुरू होता. मात्र 14 एप्रिल नंतर आलेल्या तुफान आर्थिक लाटे समोर भावनीकतेची लाट निष्प्रभ झाल्याची चर्चा आहे. प्रति मताला किमान 1 हजार रुपये ते 3 हजार रुपयांपर्यंत आर्थिक उधळण झाल्याची चर्चा गावो गावी सुरू आहे. अखेरच्या याच टप्प्यात भगीरथ भालके यांची पीछेहाट झाल्याची चर्चा आहे.

त्यामुळे मतदान झाल्यानंतर सट्टा बाजारातील चित्र बदलले असून आता अवताडे यांच्या विजयी होण्यावर जास्त पैसे लावले जातात आहेत. मंगळवारी सट्टा बाजारात भगीरथ भालके यांचा दर 40 रुपयांना 100 तर अवताडे यांना 60 रुपयांना 100 रुपये होता असे समजते. यावरून अवताडे यांच्या विजयाची शक्यता सट्टा बाजारात व्यक्त होत आहे.

दरम्यान, सट्टा बाजारात अवताडे यांचे पारडे जड दिसत असले तरी सर्व सामान्य जनतेत मात्र भगीरथ भालके यांच्या विजयाची शक्यता अधिक व्यक्त होत आहे. कारण यापूर्वी सुद्धा निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर होऊनही पैसे कमी पडलेला उमेदवार विजयी झालेला आहे. त्यामुळे सट्टा बाजारात जरी अवताडे तेजीत असले तरी जन मतांच्या बाजारात कोणाचा भाव किती आहे हे 2 मी रोजी उघडकीस येणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!