सांगली जिल्ह्यात 36 हजार नागरिकांचे स्थलांतर

7 हजार 671 कुटुंबे पुरबाधित

टीम : ईगल आय मीडिया

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७ हजार ६७१ कुटुंबातील ३६ हजार ९८७ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच लहान व मोठया १४ हजार ८०० जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरीत व्यक्तींमध्ये मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्रातील २३४ कुटुंबामधील १ हजार ६ व्यक्ती, मिरज ग्रामीण क्षेत्रातील ३०७ कुटुंबातील २ हजार २०७ व्यक्ती, अपर सांगली ग्रामीण मधील १ हजार ४२४ कुटुंबातील ५ हजार ७४९ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

वाळवा तालुक्यातील २ हजार ४५२ कुटुंबातील १४ हजार ७२५ व्यक्तींचे तर अपर आष्टा क्षेत्रातील ४२४ कुटुंबातील २ हजार १३५ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील ३९४ कुटुंबातील १ हजार ८४२ व्यक्तींचे , पलूस तालुक्यातील २ हजार ४३६ कुटुंबातील ९ हजार ३२३ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात पूरस्थितीमुळे पूर्णत: बाधित ६, अंशत: बाधित ८० अशी एकूण ८६ गावे बाधित आहेत.

यामध्ये मिरज तालुक्यात ४ गावे बाधित आहेत. अप्पर सांगली (ग्रामीण) मध्ये १५ गावे अंशत: बाधित आहेत. वाळवा तालुक्यात २९ गावे बाधित आहेत. अपर आष्टा ४ गावे बाधित आहेत. शिराळा तालुक्यातील १३ गावे बाधित आहेत. तर पलूस तालुक्यातीलएकूण २० गावे बाधित आहेत.

यामध्ये जनावरांचे मिरज तालुक्यातील मिरज ग्रामीण क्षेत्रातील १ हजार २१९, अपर सांगली ग्रामीण क्षेत्रातील १ हजार ७४६, वाळवा क्षेत्रातील ३ हजार २६२, अपर आष्टा क्षेत्रातील १ हजार ९०, शिराळा तालुक्यातील २ हजार २२८, पलूस तालुक्यातील ५ हजार २५५ जनावरांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील ५ व पलूस तालुक्यातील ३ अशा एकूण ८ जनावरांची जीवितहानी झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!