टीम : ईगल आय मीडिया
सांगली पोलीस दलातील आणखीन तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. शहर पोलिस ठाण्यात महापालिकेतर्फे केलेल्या अँटिजन चाचणीत एका उपनिरीक्षकासह तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
मिरजेतील महिला पोलिस अधिकारी पॉझिटिव्ह आल्यानंतर 3 दिवसांनी आणखी 3 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
दोन दिवसापूर्वी मिरजेतील एक महिला पोलीस अधिकारीचा रिपोर्ट पोझेटिव्ह आला होता. त्यांनंतर पोलिस दल खडबडून जागे झाले होते.
गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात महापालिकेतर्फे शहर पोलिस ठाणे, वाहतूक शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची अँटिजेंन चाचणी घेण्यात आली. यावेळी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचेही चाचणी घेण्यात आली. यावेळी ग्रामीण पोलिस ठाण्याकडील एक उपनिरीक्षक आणि वाहतूक शाखेकडील दोन कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिघांनाही पुढील उपचारासाठी हलवण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.