सांगोला तालुक्यातील कृषी विभागाच्या भ्रष्टाचाराविरोधात उच्च न्यायालयात धाव

तेल्या,अतिवृष्टी, गारपीट व नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळ्याचा पाठपुरावा करणार : ज्ञानेश्वर उबाळे 

 सांगोला : ईगल आय मीडिया

सांगोला तालुक्यातील सुमारे 10 ते 12 कोटी रुपयांच्या डाळिंब अनुदान घोटाळ्यात दोषींवर कारवाई व्हावी आणि भ्रष्टाचार करून हडप केलेली रक्कम वसूल व्हावी यासाठी आता तक्रारदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सदर याचिकेची पुढील सुनावणी २३ सप्टेंबर २०२१ रोजी ठेवलेली असुन सदर केसचे कामकाज मुंबई उच्च न्यायालयातील एड. बी.व्ही. साळुखे व एड. अशोक रामचंद्र मेटकरी हे काम पहात आहेत. सदर याचिका ज्ञानेश्वर संभाजी उबाळे यांनी दाखल केलेली आहे.

तालुक्यातील तेलकट डाग, अतिवृष्टी, गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीमुळे पहिला टप्पा सन २०० ९ ते २०१० , २०१० ते २०११, २०११ ते २०१२ दुसरा टप्पा दि . ९ / ९ / २०१५ ते १० / ९ / २०१५ या कालावधीत झालेल्यामुळे लाभार्थीना रक्कम न देता झालेल्या भ्रष्टाचाराबददल ही याचिका दाखल केली आहे.

या बहुचर्चित तेलकट डाग, अतिवृष्टी, गारपीट व नैसर्गिक आपत्ती अनुदानातील घोटाळ्यात पाठपुरावा करणार असल्याचे वाकी- शिवणे ता. सांगोला येथील सामजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर उबाळे यांनी सांगितले आहे.

 या  भ्रष्टाचाराची माहिती देताना ज्ञानेश्वर उबाळे यांनी सांगितले की,  सांगोला तालुका कृषी अधिकारी पातळीवरील सर्व अनुषंगिक अभिलेख उपलब्ध करणे तथापी रोजगार हमी योजने अंतर्गत सन २००८-२००९ तालुका कृषी अधिकारी सांगोला स्तरावरुन  ९, ६१, २२१ रुपये रक्कमेचा अपहार झाला आहे.

 2) अन्य एका प्रकरणात बनावट लाभार्थी अपहारीत रक्कम रुपये ८५, ५० , ९४५ रुपये, दि . ३१/३/२०१० ते ८ / ९ / २०११ रक्कम रुपये ४१,७५,०२२ , रक्कम रुपये ३८, ८३,००० / – , ४, ८८, ६४७   , १,०३,००० रुपये असे एकूण ५ लाख ९ १,६१७ / रुपये

  ३ ) बनावट लाभार्थी देयक क . १६७ दि. १ ९ / १ / २०११ रक्कम रुपये ६५,००,००० , मौजे वाढेगाव चेक क्रमांक ४३१५३९ दि .१५ / ३ / २०११ सोलापूर डी.सी.सी.बॅक सांगोला रक्कम १४,५३,००० रुपये 

  ४ ) अतिप्रदान लाभार्थी देयक क . १६७ दि .१ ९ / १ / २०११ रक्कम रुपये ६५,००,००० / – मौजे वझरे चेक क . ४३१८३८ सोलापुर डी.सी.सी बँक बलवडी दि . १५/३/२०१० रक्कम .६, १४,५०० रुपये,

 ५) डाळींब तेलकट डाग बनावट लाभार्थी चेक क्रमांक २५५४० दि . ९ / ८ / २०११ रक्कम रु .१४,८०,५६०- मौजे शिरभावी ता .सांगोला

  ६ ) डाळींब तेलकट डाग योजनेमध्ये बनावट लाभार्थी धनादेश क्रमांक. ४३१८३ ९ दि . १५ /३/२०१० रक्कम रुपये १४,५३,०००  सोलापूर डी.सी.सी.बॅक सांगोला डाळींब तेलकट डाग योजनेमध्ये बनावट लाभार्थी धनादेश क्र . २५५२८ रक्कम रु . ९ , २१, ६६९  सोलापूर डी.सी.सी बँक शिवणे

  ७ ) डाळींब तेलकट डाग योजनेमध्ये बनावट लाभार्थी धनादेश क्रमांक . ९९ ८३५६ दि . २१/१०/२०११ रक्कम रु . ८,११,१ ९ ४ रुपये सोलापूर डी.सी.सी बॅक शिवणे 

  ८ ) डाळींब तेलकट डाग योजनेमध्ये बनावट लाभार्थी धनादेश क्रमांक . १४६८८ दि . २६ / ६ / २०० ९ रक्कम रु . २७,५३,८३० वैनगंगा ग्रामीण बँक मांजरी चेक क्रमांक . १४७०० रक्कम रुपये ४ , ९ १,४८५ / – दि . ६ / ७ / २०० ९ सोलापुर डी.सी.सी बॅक सांगोला चेक क्रमांक . ३७४८७३ दि . ३१/३/ २०१० रक्कम रुपये ७०,८७१ युनियन बँक सांगोला .

  ९) चेक क्रमांक . २५५४० दि. ९ / ८ / २०११ अपहारीत रक्कम रुपये १४, ८०, ५६० बँक ऑफ इंडिया शाखा, सांगोला 

 १० ) अतिवृष्टी डाळींब तेलकट डाग नियंत्रण आदर्श व्यवस्थापन पॅकेज अपहारीत रक्कम रु .८४ ,८९ , १०८ रुपये,

 ११ ) अतिवृष्टी डाळींब तेलकट डाग नियंत्रण आदर्श व्यवस्थापन पॅकेज अपहारीत रक्कम  ६१, ८३७ रुपये,

 १२ ) सन २०० ९ ते २०१० या कालावधीत मदत रक्कम रुपये १ , ९ ५ , ९ ३,००० , २०१० ते २०११ या कालावधीत मदत रक्कम रुपये ९ , ६८, ७२,००० , सन २०११ ते २०१२ या कालावधीत मदत रक्कम रु . १ , ९ ३, ७७,००० , नैसर्गिक आपत्ती अपहारीत रक्कम रु . ३७, ८०,०००, नैसर्गिक आपत्ती अपाहरीत रक्कम रु . १,०३, ००० , डाळींब तेलकट डाग नियंत्रण आदर्श पॅकेज ४, ८८, ६४७ रुपये , 

  अशाप्रकारे भ्रष्टाचार झालेला असुन न्यायालयाने संबंधित भ्रटाचारी , कुचराई , रक्कम रुपये अपहारीत करणा – या दोषी अधिकारी व संबंधित खातेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे, खातेनिहाय चौकशी व अपहारीत रक्कम शासनास त्वरीत जमा करणेचे आदेश देणार आहेत यासाठी याप्रकरणी सुनावणीची तारीख २३ सप्टेंबर २०२१ अशी आहे, असे शेवटी त्यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!