शेततळ्यात बुडून पती पत्नीचा मृत्यू

सांगोला तालुक्यातील दुर्घटना

टीम : ईगल आय मीडिया

धायटी ( ता.सांगोला, जि. सोलापूर ) येथे शेततळ्यात बुडून तरुण पती पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज ( सोमवार रोजी ) घडली असून या घटनेने सांगोला तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

यासंदर्भात अधिकचे वृत्त असे की, धायटीचे पोलीस पाटील प्रवीण लक्ष्मण गायकवाड यांनी सांगोला पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार, सांगोला शहरापासून जवळच असलेल्या धायटी गावातील पुजारी वस्ती येथे गोविंद नारायण पाटील यांच्या शेत तळ्यात शीतल पुजारी पाणी भरण्यासाठी गेली होती. या दरम्यान शीतल ( वय 22 वर्षे ) हिचा पाय घसरून त्या शेततळ्यात पडली.

पती मल्हारी बाळू पुजारी (वय30 वर्षे ) यांनी तातडीने धावतळ्यात उडी घेतली आणि शीतल यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण तळ्यात असलेल्या शैवाळाने त्यांना पत्नीसह बाहेर येता आले नाही. आणि दोघेही तळ्यात बुडाले. दोघेही तरुण पती पत्नी एकाच वेळी दुर्घटनेत मयत झाल्याने तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.  पुढील तपास पोहेकॉ पवार हे करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!