मंत्रीपदासह आमदारकीचा ही राजीनामा देऊन पोहोरादेवी कडे जाणार
टीम : ईगल आय मीडिया
राज्याचे वनमंत्री संजय राठोड अखेर राजीनामा देणार आहेत. केवळ मंत्रिपदाचाच राजीनामा देऊन थांबणार नाही तर ते आमदारकीचाही राजीनामा देणार आहेत अशी माहिती पोहोरादेवी चे महंत जितेंद्र महाराज यांनी दिली आहे. सव्वा वर्षे वयाच्या ठाकरे सरकारमधून राजीनामा द्यावा लागणारे राठोड हे पहिलेच मंत्री ठरणार आहेत.
त्यानंतर ते वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे जाणार आहेत. ते आपल्या मंत्रिपदाचासोबतच आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याची माहिती पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी दिली आहे. यासंदर्भात पोहरादेवी येथे बैठक होणार असल्याचेही त्यांनी यावेळी त्यांनी सांगितलं आहे.
पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वन मंत्री संजय राठोड हे आज किंवा उद्या राजीनामा देणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. संजय राठोड यांच्यामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले असून सरकार सह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. त्यामुळे राठोड यांच्यावर राजीनाम्याबाबत दबाव वाढला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राठोड राजीनामा देणार आहेत असे समजते.