संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये : अत्याचाराविरुद्ध लढणारा मी पँथर

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा संजय राऊतांवर पलटवार

मुंबई : ईगल आय मीडिया

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आजपर्यन्त कधीही दलित अत्याचाराविरुद्ध ब्र शब्द काढला नाही. दलित अत्याचारविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत. दलित अत्याचार जिथे होईल तेथे मी पोहोचलेलो आहे. दलित अत्याचराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. दलित पँथर च्या चळवळीतून मी पुढे आलो आहे. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचे शिकवू नये, असा टोला देत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

संजय राऊत यांनी ना रामदास आठवलेंवर टीका करताना हाथरस प्रकरण घडत असताना आठवले हे नटींच्या घोळक्यात होते असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना ना रामदास आठवले यांनी म्हंटले आहे की, संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतात की नाही ते माहीत नाही. मी मात्र नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो.

हाथरस ची घटना घडली त्यादिवशी मुंबईत राज्यपालांची पूर्वनियोजित भेट ठरली होती. ती भेट झाल्यानंतर आम्हाला हाथरसच्या घटनेची माहिती मिळाताच त्या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध केला. आंदोलन केले. लखनौला जाऊन उत्तर प्रदेश च्या राज्यपालांना भेटलो. हाथरस ला भेट देण्यास जाताना तेथिल जिल्हा प्रशासनाने सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेट देण्यापासून अडविले होते. त्यामुळे मी दि. 2 ऑक्टोबर ला हाथरस जाऊ शकलो नाही. आता मात्र उद्याच हाथरस ला जाऊन पीडित बळीत दलित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. त्यांना संरक्षण मिळवून देणार अहे असा खुलासा ना रामदास आठवले यांनी केला.

संजय राऊत हे कधी सामना मधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर व्यक्त झाले नाहीत आणि संसदेत खासदार म्हणून ही दलित अत्याचार प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला नाही.दलितांच्या प्रश्नांवर दलित लढत असतात पण दलितांच्या प्रश्नांसाठी सवर्ण पुढाऱ्यांनी कधी लढा उभारला आहे का? दलितांचे मतदान हवे आहे पण दलितांवरील अत्याचाराचा साधा निषेध तरी यापूर्वी कधी संजय राऊत आणि त्यांच्या पक्षनेत्यांनी केला आहे का?असा सवाल ना रामदास आठवले यांनी केला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!