उजनीच्या पाण्या संदर्भात आ.शिंदे यांचे अजित पवारांना पत्र

पुणे जिल्ह्यातील सांडपाणी पुणे जिल्ह्यातच आडवा


कुर्डुवाडी : ईगल आय मीडिया


पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भागातुन ऊजनी धरणात पाच टिएम सी पाणी येते असे म्हणत इंदापुरला तेच पाणी घेऊन जाण्याच्या मुद्यावर आ.संजयमामा शिंदे यांनी खटक्यावर बोट ठेवत वादग्रस्त होत चाललेल्या मुद्यावर तोडगाच काढला आहे. जर पुणे जिल्ह्यातील खरच पाच टि एम सी पाणी ऊजनी जलाशयात येत असेल तर तुम्ही ते सांडपाणी प्रक्रिया करुन नजिकच्या खडकवासला धरणाच्या विविध कालव्यातुन इंदापुरच्या भागाला द्यावे. त्याचा खर्च देखील कमी असेल असा तोडगा करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी राज्याचे ऊपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र लिहुन सुचवला आहे.


सकारात्मक निर्णय होईल
ऊजनी चे पाणी आहे या योजनांनाच पुरत नाही. ऊन्हाळ्यात अनेक योजना पाण्याअभावी बंद पडतात. ऊजनीतुन मराठवाड्याला पाणी मंजुर केलेले आहे.त्यात इंदापुरची योजना राबवली तर पहिल्या योजनेवर अन्याय होणार आहे .म्हणुन इंदापुरला पाणी हे पुणे जिल्ह्यातच आडवुन कालव्यातुन तेच पाणी वापरावे.
आ.संजयमामा शिंदे
( करमाळा विधानसभा)


जिल्ह्यातील सर्व संघटना सर्व पक्ष पालकमंत्री दत्तामाम भरने यांच्यावर आक्रस्थळी होऊन टिका करित होता. ऊजनीचे पाणी नियोजन पुर्ण झाले आहे. मराठवाड्याला देखील यातील साडेसात टिएम सी पाणी देण्याचे नियोजित आहे. परत जर इंदापुरला पाच टिएम सी पाणी दिले तर सोलापूूर जिल्ह्यातील रखडलेल्या योजनांवर याचा परिणाम होईल.

शेतकऱ्यांच्या जिवनावरच थेट परिणाम होईल. त्यामुळे सोलापुर जिल्ह्यातुन स्थानिक जनतेचा विरोध आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे पाणी पुणे जिल्ह्यातच आडवुन प्रक्रिया करुन तेच पाणी घ्या ऊजनीचा एकही थेंब नको असे धडधडीत पत्र लिहुन अजित पवार यांना आ.शिंदे यांनी कळवले आहे. ऊजनी धरणाच्या पाण्याचे शंभरटक्के नियोजन झाले आहे. कोणतेही अतिरिक्त यात पाणी नाही. त्यामुळे मी सोलापुर जिल्ह्यातील एक शेतकरी प्रतिनिधी म्हणुन आपणासविनंती करतोय असे पत्रात आ. शिंदे म्हणालेत.


आ.शिंदे यांची भुमिका योग्यच-
ऊजनी धरणातुन अजुन विठ्ठलगंगा बेंद ओढ्याला एक ही थेंब मिळाला नाही . सिनामाढा योजनेला शेवटपर्यंत पाणी अजुनही निट मिळत नाही. आम्हालाच पाणी अपुरे पडते . त्यामुळे ऊजनीचे पाणी इंदापुर न देता पुणे जिल्ह्याचे सांडपाणी थेट पुणे तुनच ऊचलावे हा तोडगा व हि भुमिका आ.संजयमामा शिंदे यांची योग्यच आहे.
सुरेष बागल
(माढा तालुका पंचायत समिती सदस्य)

Leave a Reply

error: Content is protected !!