
टीम : ईगल आय मीडिया
ववविदर्भातील पंढरी अशी ओळख असलेल्या संत गजानन महाराज यांचे मंदिर पुढील शासनादेश येईपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद राहील असे संस्थान च्या वतीने कळवण्यात आले आहे.
शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून केवळ महाराष्ट्रातील भाविक नाहीत तर देशातील अनेक राज्यांमधून भाविक येथे दररोज गर्दी करतात. मंदिरात मोठी गर्दी होत असल्यानेच प्रशासनाने हे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात करोनाने डोके वर काढले असून करोना प्रादुर्भाव लक्षात घेत बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील प्रसिद्ध श्री. गजानन महाराजांचे मंदिर आज रात्रीपासून दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील निर्देश येईपर्यंत हे मंदिर बंदच राहणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.