पंढरपूर : ईगल आय मीडिया
आषाढी यात्रेकरिता पंढरपूरसाठी परवानगी मिळालेल्या राज्यातील मानाच्या प्रमुख पालख्यांपैकी एक असलेल्या संत निळोबाराय पालखी सोहळ्याने पिंपळनेर येथून मंगळवारी सकाळी प्रस्थान ठेवले . यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके प्रमुख उपस्थित होते. पंढरपूरच्या वारीसाठी राज्यभरातून मानाच्या प्रमुख नऊ पालख्यांना राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यापैकी संत निळोबाराय यांचा पालखी सोहळा आहे. पिंपळनेर ( तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर ) येथून हा पालखी सोहळा सुमारे 300 वर्षापासून पंढरपूरला आषाढी यात्रेसाठी येत आहे. या परंपरेमुळे यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केवळ 9 पालखी सोहळ्याला परवानगी दिलेली आहे. संत निळोबाराय यांचा पालखी सोहळा मानाच्या पालख्या पैकी एक आहे. पिंपळनेर येथून राज्य शासनाच्या शिवशाही बस मध्ये वीस वारकऱ्यांसह मंगळवारी सकाळी पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
पारनेर श्रीगोंदाचे उपजिल्हाधिकारी तथा प्रांतधिकारी पण मूळचे सरकोली ( तालुका पंढरपूर ) श्री सुधाकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.
या पालखीचे इनसिडेंट ऑफिसर म्हणून श्रगोंदाचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.