मतमोजणी झाल्यानंतर ठरणार 8 दिवसांनी सरपंच आरक्षण
टीम : ईगल आय मीडिया
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 3 दिवसांत सर्व नवनिर्वाचित सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल आणि त्यानंतर 25 जानेवारी रोजी राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढली जावी असे आदेश ग्रामविकास विभागाने काढले आहेत. यावरून 25 जानेवारी रोजी सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामपंचायतसाठी 30 डिसेंम्बर पर्यंत अर्ज भरणे, 15 जानेवारी रोजी मतदान, 18 जानेवारी रोजी मतमोजणी आणि निकाल ते त्यानंतर 21 जानेवारीपर्यंत नूतन सदस्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. 21 जानेवारी रोजी त्यांना सरपंच पद आरक्षण सोडती बाबत नोटिसा देऊन 25 जानेवारी रोजी नूतन सरपंच पदाची आरक्षण सोडत काढली जाईल.
राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. मात्र सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीचा पूर्वनियोजित कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. 16 डिसेंबर रोजी होणार सरपंच पदाची आरक्षण सोडत आता ग्रामपंचायत निकालानंतर काढली जाणार आहे.
आणि 21 फेब्रुवारी पर्यंत सरपंचाची पहिली मासिक सभा घेण्यात यावी असे आदेश ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांना काढले आहेत. त्यामुळे आता सरपंच पदाची आरक्षण सोडत 25 जानेवारी रोजी काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.