सोलापूर जिल्हाधीकाऱ्यांचे आदेश
टीम : ईगल आय मीडिया
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत बुधवार दि. 27 जानेवारी घेण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. त्यामुळे 8 दिवसांत सरपंच आरक्षण सोडत काढली जाणार असून 18 फेब्रुवारी पूर्वी नूतन सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडी होणार आहेत.
याबाबत आज जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल।जाहीर झाल्यानंतर सर्वांना सरपंच पदाच्या आरक्षण सोडतचे डोहाळे लागले आहेत. ही सोडत कधी काढली जाते याकडे लक्ष लागलेले असतानाच आजच ( दि. 18 जानेवारी रोजी ) जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यापूर्वी 11डिसेंबर 2020 रोजी हा कार्यक्रम सोलापूर जिल्ह्यात घेतला जानार होता मात्र त्यावेळी तो पुढे ढकलून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर घेण्यात येईल असे शासनाने कळवले होते.
आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि मतमोजणी झाल्यानंतर नूतन सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडी घेण्यात याव्यात असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर यांनी काढले आहे. निवडणूक झाल्यानंतर 30 दिवसांत नूतन सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडी करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.
त्यानुसार 27 जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढून नूतन सरपंच निवडीचा मार्ग मोकळा केला जात आहे. आरक्षण सोडत निघाल्यानंतर गाव पातळीवर चे राजकारण पुन्हा रंजक होणार असल्याचे दिसून येते.