पंढरपूर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण 325
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गुरुवार आणि शुक्रवारी पंढरपूर शहर आणि ग्रामीणमध्ये 31 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर शनिवारचा दिवस मात्र 44 पॉझिटिव्हची चिंताजनक फिगर घेऊन उजाडला आहे. यामध्ये शहरातील 30 तर देगाव 8 , सरकोली 5, आंबे 1 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यासह तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 325 एवढी झाली आहे.
अधिकृत सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीच 11 वाजण्याच्या सुमारास आलेल्या रिपोर्ट्स मध्ये 44 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यामध्ये शहरातील 30 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर ग्रामीण भागातील 14 अहवाल आहेत.
शहरात 222 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत, तर ग्रामीण भागात एकूण 85 पॉझिटिव्ह केसेस आढळल्या आहेत. तालुक्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 315 एवढे झाले आहेत. आजवर तालुक्यातील 87 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर सध्या 224 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
328 लोक क्वारंटाईन ! वाखरी mit कोविड केअर सेंटर, खेडलेकर महाराज मठ,गंगागिरी महाराज मठ, मोरे महाराज मठ, राऊळ महाराज मठ, केंद्रे महाराज मठ, तनपुरे महाराज मठ, गजानन महाराज मठ, स्टेट बँक शाखा अशा संथात्मक क्वारंटाईन केंद्रात एकूण 328 लोक आहेत.
पंढरपूर शहरात आणखी 30 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकूम रुग्ण 227 झाले आहेत. तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या त्रिशतकी म्हणजेच 326 एवढी झाली आहे .
शुगाव दु. मध्ये पेशंट नाही. हि चुकीची बातमी देउ नका
आभारी आहे बातमी दुरूस्त केल्याबद्दल 🙏🙏🙏