आज रस्त्यावर, उद्या सरकार व न्यायदेवतेच्या दारात बसू !

अ.भा.समता परिषद व ओबीसी समाजाचा इशारा

पंढरपूर : ईगल आय मीडिया


यावेळी रस्त्यावर बसलोय, उदया सरकारच्या व न्यायदेवतेच्या दारातही जाऊन बसायला मागे सरणार नाही. तुम्हीं जर आम्हांला सरणावर न्यायची तयारी करत असाल तर आम्हीं हालगी नादाने त्याच स्वागतच करु, पण तरीही मागेे सरणार नाही, सरकार जर पाठपुरावा करायला मागे पडत असेल तर आम्हीं तो पुर्णत्वास नेऊ , अशा घोषणा देत स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पंढरीत समता परिषद आणि ओबीसी समाज घटकांचे रास्ता रोको आंदोलन पार पडले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व समस्त ओबीसी बांधव पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्था मधील धोक्यात आलेले ओबीसी चे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी गुरुवारी येथील सांगोला रोडवरील सावित्रीबाई फुले चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. समता परिषदेचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, अतिष देवमारे यांच्या नेतृत्वाखाली अ. भा. महात्मा फुले समता परिषद व समस्त ओबीसी समाज बांधवांच्या वतीने हे आंदोलन पार पडले.


यावेळी आबासाहेब खारे (समता परिषद जिल्हाध्यक्ष), अमोल डोके (नगरसेवक), बजरंग देवमारे (नगरसेवक), सौ.साधनाताई राऊत (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस महिला), संजय निंबाळकर (नगरसेवक), इब्राहिम बोहरी (नगरसेवक), संतोष पवार (आरपीआय शहर अध्यक्ष) अनिल अभंगराव, अरुणभाऊ कोळी, बाबा चव्हाण, सचिन देवमारे, उमेश सासवडकर, दत्ता देवमारे, अमोल माळी, ज्ञानेश्वर बनसोडे, मनोज फुले, सचिन गोडसे, वैभव गाडेकर, अजिंक्य देवमारे,सागर नवले, बाळासाहेब देवमारे, मसु राऊत, दशरथ माळी,शाहू यादव,युवराज सातपुते आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!