होळकर वाड्याची वीट जरी हालविली तर राज्यभर आंदोलन

होळकर वाडा बचाव समितीचा ईशारा : विकास करताना देखील ऐतिहासीक वास्तू जतन करावी 

फोटो : पंढरपूर येथील होळकर वाडा बचाव समितीची बैठकीस उपस्थित नागरिक


पंढरपूर  : ईगल आय न्यूज
पंढरपूर तीर्थक्षेत्र सुधारित विकास आराखडा राबवताना ऐतिहासीक वास्तू जतन करणे गरजेचे आहे, मात्र या कामाच्या वेळी जर ऐतिहासिक होळकर सरकार  वाड्याची एक वीट जरी हलविली तर राज्यभर  आंदोलन होईल असा ईशारा होळकर वाडा बचाव  समितीने दिला आहे.  


पंढरपूर येथील  महाद्वार पोलीस चौकी ते महाद्वार घाट रस्ता कॉक्रीटीकरण व रुंदीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात सादर करण्यात आला आहे.  यामुळे या रस्त्यावर असलेल्या  होळकर वाड्याचा काही भाग बाधित होणार आहे. हे स्पष्ट झाल्यानंतर या ऐतिहासिक वाड्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. गुरुवारी याच होळकर वाड्यामध्ये धनगर समाजबांधवाची बैठक घेण्यात आली. या बैठकी दरम्यान होळकर वाडा बचाव समिती निर्माण करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी अर्जुन सलगर यांची निवड करण्यात आली आहे.


होळकर सरकार  वाड्याचे व्यवस्थापक अदित्य फेत्तपुरकर यांनी सांगितले की,  होळकर वाडा ही पंढरपूर शहरातील  ऐतिहासीक वास्तू आहे. रस्ता रुंदीकरण केल्यास होळकर वाड्यातील राम मंदिर व मारुती मंदिर देखील पाडावे लागणार आहे. शासन ऐसिहासीक वारसा जपण्यासाठी अनेक प्रयत्न करत असते. मात्र पंढरपुरात ऐतिहासीक वस्तु नष्ट करण्याचे काम होणार आहे. यामुळे यास सर्वांनी मिळून विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच या विरोधात  राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


यावेळी होळकर वाडा व्यवस्थापक अदित्य फत्तेपूरकर, संतोष सुळे, अर्जुन सलगर, राज्य मागासवर्ग आयोग सदस्य प्रा. लक्ष्मण हाके, सुरेश कांबळे, डॉ.मारुती पाटील, गणपतराव वाघमोडे, शिवाजीराव पाटील, दादासाहेब काळे, बाळासाहेब किसवे, परमेश्वर कोळेकर, गणपतराव वाघमोडे, कृष्णदेव वाघमोडे, शिवराज पुकळे, सतिश कुलाळ, विठ्ठल पाटील, शालिवाहन कोळेकर, राजेंद्रकुमार बुध्याळ, भारत कोळेकर, प्रा.संजय लवटे, द्रोणाचार्य हाके, प्रा.दत्ता डांगे, विष्णु देशमुख, महेश येडगे, संतोष बंडगर, सोमनाथ ढोणे, संतोष शिरगिरे, आण्णा सलगर, प्रसाद कोळेकर, सतिश लवटे, भगवंत पळसे, भजनदास गावडे, दत्तात्रय माने, नितीन शिंदे, प्रशांत अल्लापुरकर, राजु उराडे, मिलिंद येळे, सुरज सोलवनकर, अनिकेत मेटकरी, सुरज पडवळकर, पांडुरंग भेंकी, मोहन वगरे, काशिनाथ कोळेकर, सत्यवान सरगर, मारुती गोरे, बिराप्पा मोटे उपस्थित होते.


Leave a Reply

error: Content is protected !!