महादेव कोळी (s.t.) समाजातील कर्मचाऱ्यांना सेवेत संरक्षण देण्याची मागणी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

राज्यात st प्रवर्गातील हजारो शासकीय कर्मचाऱ्यांच्या शासकीय सेवेत संरक्षण मिळावे आणि त्यांच्या सेवा कायम ठेवाव्यात अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. या संदर्भात शिंदे यांनी ना. पवार यांच्याकडे लेखी पत्र दिले आहे.

राज्य सरकार सेवेत गेली 12 वर्षापूर्वी जातप्रमाणपत्र अवैध झालेच्या कारणावरुन हजारो शासकीय कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले होते. त्या नंतर या समाजाने लोकशाही मार्गाने अनेक आंदोलने करुन शासन दरबारी न्याय मागितला होता. 21 डिसेंबर 2019 रोजी शासन निर्णय काढून सेवेतून कमी केलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदे निर्माण करुध 11 महिने सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचे उद्धवस्त झालेले कुटुंब पुन्हा एकदा उभे राहिले आहेत.


या कर्मचाऱ्यांना 11 महिन्या नंतर सेवेत कायम करावे का कसे? यासाठी शासनाने आदरणीय ना.छगन भुजबळ यांचे अध्यक्षेतेखाली एक कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीचा अहवाल अद्यापही आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील महादेव कोळी समाजातील शासकीय कर्मचाऱ्यांचे पुढील भविष्य अवलंबून आहे. तेव्हा नव्याने सेवेत घेतलेल्या व पूर्वी सेवेत असलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना न्याय देवून त्यांना सेवेत कायम करावे अशी मागणी ही शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!