पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यातील गादेगाव, भंडीशेगाव, नारायण चिंचोली या गावांचे आरक्षण बदलले असून त्याऐवजी पोहोरगाव, शेंडगेवाडी आदी 4 गावांचे आरक्षण अनु जाती साठी निघाले आहे.
तालुक्यातील 91 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके उपस्थित आहेत.
या 20 ग्रामपंचायतीचे आरक्षण अनुसूचित जाती साठी राखीव झाले आहे. तिसंगी, सोनके, आंबे चिंचोली, कोंढारकी, सुस्ते, शेवते, शिरढोन, मेंढापुर, नेपतगाव, चळे, भटुंबरे, पळशी, खरसोळी, पोहोरगाव, सुगाव खुर्द, नारायण चिंचोली, पुळूज वाडी, बारडी, आव्हे-तरटगाव, शेंडगेवाडी ही गावे अनु जातीसाठी राखीव आहेत.
येथील शासकीय गोदामात आज तालुक्यातील 91 गावच्या सरपंच आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात झाली आहे. लोकसंख्या निकष ठरवून तालुक्यातील गावे आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये 3 गावे अनुसूचित जमाती साठी राखीव झाली आहेत. तारापूर, रोपळे आणि शेगाव दुमाला या तीन गावचे सरपंच पद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाले आहे.
अनुसूचित जमाती साठी रोपळे, शेगाव दुमाला आणि तारापूर ही तीन गावे आरक्षित झाली आहेत. या तिन्ही जागी महिलांना आरक्षण मिळाले आहे.