राष्ट्रवादीचे आम. नवाब मलिक यांना जामीन

आरोग्यविषयक कारणासाठी दोन महिन्यासाठी जामीन मिळाला

team : eagle eye news

मुंबईतील मालमत्तांशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मागील दीड वर्षांपासून तुरुंगात असणारे राष्ट्रवादीचे नेते आमदार नबाव मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ईडीने सर्वोच्च न्यायालयात मलिक यांच्या जामिनास विरोध केला नसल्याने मलिक यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे नवाब मलिक तब्बल १ वर्ष ५ महिन्यानंतर जेलबाहेर येणार आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव पुढील २ महिन्यांसाठी मलिकांना जामीन मिळाला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अल्पसंख्याक विकास मंत्रिपद सांभाळणाऱ्या नवाब मलिक यांना ‘ईडी’ने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. कथित टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंगचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला होता.

नवाब मलिक मूत्रपिंडाच्या उपचारांसाठी कुर्ला येथील खासगी रुग्णालयात दाखल आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिल्यानंतर मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठाने मलिक यांच्या याचिकेवर निर्णय देताना त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना जामीन मंजूर केला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!