शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा.शरद पवार करणार पाहणी
टीम : ईगल आय मीडिया
सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी परिसरातील नवीन इमारतीला लागलेली आग पुन्हा भडकली आहे. पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला दुपारी 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पुणे : सीरम इन्स्टिट्यूटच्या परिसरातील इमारतीला लागलेली आग पुन्हा भडकली आहे. दुपारी 2 च्या सुमारास सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. ही आग विझवण्यात आली, मात्र संध्याकाळी 7 वाजता या इमारतीच्या 6व्या मजल्यावर आग पुन्हा भडकली. ही आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत.दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा.शरद पवार घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहेत.
या आगीत मरण पावलेल्या कामगारांची नावे राम शंकर हरिजन, बिपीन सरोज, सुशील कुमार पांडे, महेंद्र इंगळे, प्रतीक पाष्टे अशी आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , खा. शरद पवार पाहणी करणार
आगीच्या घटनेची शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा. शरद पवार पाहणी करणार आहेत. ठाकरे यांनी आज सायंकाळी सीरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अदर पुनावाला यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. शुक्रवारी मुख्यमंत्री हेलिकॉप्टर ने पुण्यात येऊन सीरम इन्स्टिट्यूटला भेट देउन पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही सीरम इन्स्टिट्यूटची पाहणी करणार असल्याचं कळतंय.
कोव्हिशील्ड लस सुरक्षित : पुनावाला यांची माहिती
या आगी नंतर सुदैवानं कोव्हिशील्ड लस सुरुक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ज्या इमारतीमध्ये लस निर्मितीचं काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली नाही़. कोव्हिशील्ड लस बनवली जात असलेली जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला असलेल्या गेट आहे, तिथे ही आग लागली आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नसल्याची माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे.