स्वेरीमध्ये ‘सेसा-२ के२३’ संपन्न

सिव्हील अभियंत्यांना बांधकाम क्षेत्रातील सखोल माहिती असावी  ; सहाय्यक अभियंता प्रदीप क्षीरसागर

photo : श्री.विठ्ठल अभियांत्रिकीच्या सिव्हील विभागात ‘सेसा २ के २३’ हा उपक्रम संपन्न झाला. यावेळी  उपस्थित  कृष्णा भोसले, प्रा.ए.बी. कोकरे, प्रा.एस.ए.गोसावी महेश क्षीरसागर,  प्रदीप क्षीरसागर व समन्वयक प्रा.समीर मस्के.

पंढरपूर : eagle eye news
‘स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सखोल ज्ञान आणि धाडसी वृत्ती हे गुण अंगीकारणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना आत्मविश्वास वाढतो तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील भावी अभियंत्यांनी बांधकाम क्षेत्रातील सखोल माहिती मिळविणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन  जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रदीप क्षीरसागर यांनी केले.


             स्वेरीचे संस्थापक सचिव तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेसा २ के २३’ अंतर्गत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी क्षीरसागर बोलत  होते. यावेळी  स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांनी ‘सेसा-२ के २३’ या उपक्रमासंबंधी माहिती देऊन ‘सेसा’ सारख्या संशोधनात्मक स्पर्धांच्या माध्यमातून संशोधनासाठी चालना मिळते.’ असे सांगितले.

 यावेळी स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, प्रा.ए.बी.कोकरे, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.समीर मस्के, प्रा.एन.डी.मोरे, विद्यार्थी सेसा अध्यक्ष कृष्णा भोसले, सेसा उपाध्यक्ष दीपक शिंदे, सचिवा शुभांगी उंबरजे, खजिनदार शहीद बागवान यांच्यासह ‘सेसा’चे पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग तसेच स्वेरीचे व इतर अभियांत्रिकी महाविद्यालयातील  विद्यार्थी, स्पर्धक उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!