सोलापूर जिल्ह्यात 7 तालुक्यातील सरपंच निवड पुढे ढकलली

4 तालुक्यातील निवडी होणार : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सोलापूर : ईगल आय मीडिया

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, माढा, माळशिरस सह 7 तालुक्यातील सर्व गावच्या सरपंच आणि उपसरपंच निवड पुढे ढकलण्यात आली असून आज ( 8 फेब्रुवारी रोजी ) जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबत चा आदेश काढला आहे. उर्वरित 4 तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम नियोजित तारखेनुसार होणार आहे.

जिल्ह्यातील 652 ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत आणि 27 रोजी सर्व 1 हजारहून अधिक ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत काढली आहे. 9, 11 आणि 13 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील 652 ग्रामपंचायत सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता.

मात्र न्यायालयीन तक्रारी नंतर पंढरपूर, माढा, माळशिरस, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सांगोला, मोहोळ या 7 तालुक्यात होणाऱ्या सर्व गावच्या नियोजित सरपंच, उपसरपंच निवडी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

तर करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, मंगळवेढा या तालुक्यातील सर्व गावच्या सरपंच, उपसरपंच निवडी मात्र नियोजित तारखांना होणार आहेत. असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केले आहे.

त्यामुळे उद्या ( दि.9 फेब्रुवारी ) रोजी होणाऱ्या सरपंच आणि उपसरपंच निवडी आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच उद्या सह 11 आणि 13 फेब्रुवारी च्या निवडीच्या अनुषंगाने बाहेरगावी फिरायला गेलेल्या सदस्यांची ही अडचण झाली आहे. सरपंच, उपसरपंच पदाचे इच्छुक आणि गावोगावच्या पॅनल प्रमुखांची ही मोठी पंचाईत झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!